Breaking News

कर्जतच्या सुनील शिर्के यांचा पंतप्रधानांनी केला गौरव

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील सांडशी गावातील विशेष सुरक्षा रक्षक सुनील मधुकर शिर्के यांना, त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवित केले आहे.

सुनील शिर्के यांचा जन्म सांडशी गावात एका शेतकरी कुटुंबामध्ये जुलै 1979 मध्ये झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण सांडशी येथे, तर सातवीपर्यंतचे शिक्षण जवळच असलेल्या माणगाव येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण खांडपे येथील ज्ञान मकरंद विद्यालयात पूर्ण केले आणि पुढील शिक्षण त्यांनी खोपोलीत घेतले.

शिक्षण सुरू असतानाच त्यांना 2001 मध्ये भारतीय सुरक्षा दलाचे बोलावणे आले. नागोठणे येथे ते सुरक्षा रक्षक दलात (सीआयएसएफ) भरती झाले. त्यानंतर ते 2009 मध्ये विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) सेवेत दाखल झाले. त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल 2019 मध्ये त्यांची विशेष सुरक्षा दलामध्ये (एसपीजी) निवड झाली. नुकतेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये देऊन गौरवित करण्यात आले. या सन्मानाबद्दल सुनील शिर्के यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

भारतीय विशेष सुरक्षा दलामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्या मुलाला सन्मानित केले त्याचा सार्थ अभिमान वाटतो. सुनीलने देशासाठी असेच कार्य करीत राहावे, अशी माझी मनोमन इच्छा आहे.

-मधुकर शिर्के, सांडशी, ता. कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply