Breaking News

शेकापचे युवा नेते संतोष मंजुळे भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता दिवेसेंदिवस वाढत चालली असून, अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत शेकापचे माजी नगरसेवक शंकर मंजुळे यांचे पुत्र संतोष मंजुळे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये रविवारी जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहे. त्याअंतर्गत पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे संतोष मंजुळे यांच्यासह विजय शिंदे, शिवराम भालेराव, प्रवीण रणदिवे यांच्यासह अनेक समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply