Breaking News

कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त

दैनिक पुण्यनगरीच्या वतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सन्मान सोहळा 2019चे आयोजन शुक्रवारी (दि. 1) करण्यात आले होते. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव, ती सर्वस्वी समाजाचा उत्कर्ष आणि सई जल्लोष गु्रप डान्स रंगला. सोहळ्याला लेखिका विजया वाड आणि पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पंचायत समिती सदस्या व भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., माथेरानच्या नगराध्यक्षा पे्ररणा सावंत, पनवेलच्या माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सिडकोच्या सहव्यवस्थापक संचालिका प्राजक्ता लवंगारे, ‘पुण्यनगरी’चे संपादक संजय मलमे, वरिष्ठ उपसंपादक राजेश दाभोळकर, भाजप महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस लीना पाटील, शहर सरचिटणीस सपना पाटील, कामोठे चिटणीस उषा डुकरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply