पनवेल : रामप्रहर वृत्त
बामणडोंगरी येथे जीवदानी स्पोर्ट्स व जीवदानी इंटरप्रायजेस यांच्या वतीने लोकनेते माजी खासदार चषक तथा लोकप्रिय आमदार चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 12) भेट दिली.
या वेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी बामणडोंगरी गावासाठी क्रिकेटचे मैदान मिळावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निवेदन दिले, तसेच या ठिकाणी सुनंदा म्हात्रे आणि प्रदीप खोत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य तथा उलवे नोड-2 अध्यक्ष विजय घरत, उलवे नोड-1 अध्यक्ष मदन पाटील, साईचरण म्हात्रे, अजय भगत, निर्गुण कवळे, हरेश म्हात्रे, शैलेश भगत, विजय ठाकूर, ज्येष्ठ नेते केसरीनाथ म्हात्रे, प्रकाश कोळी, नाना गडकरी, आनंद शिंदे, महेशशेठ म्हात्रे, किरण जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेला भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनीही भेट दिली होती.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …