नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
सिडकोच्या उलवे नोड येथील अग्निशमन केंद्राचे 9029003201 व 9029003202 हे संपर्क क्रमांक तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात येत असून त्याऐवजी 8657461125 आणि 8657461126 हे नवीन मोबाईल क्रमांक तेथील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी सिडको उलवे नोडमधील नागरिकांनी आणीबाणीच्या काळात उपरोक्त नवीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.