Breaking News

सुकापूरमधून मताधिक्य देणार; बैठकीत उपस्थितांचा निर्धार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका होत असून या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सुकापूर येथे राजेश पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रतिसाद मिळाला. या वेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. उपस्थितांनी सुकापूरमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला.

या बैठकीला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, गणेश सुरमे, चाहूशेठ पोपेटा, माजी सरपंच एकनाथ भोपी, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, दत्ता भगत, भागवान भगत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, पांडुरंग केणी, अशोक पाटील, महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अनिल पोपेटा, राजेश पाटील, संजय पाटील, योगेश पाटील, उदय म्हसकर, भरत म्हसकर, चंद्रकांत पोपेटा, आनंद म्हसकर, प्रताप आरेकर, प्रल्हाद केणी, मनोज पवार, शिवराम शेलके, जगदीश पोपेटा, रूपेश पाटील, महेश केणी, प्रकाश पोपेटा, गामपंचायत सदस्य मीना संजय पाटील, कविता पोपेटा, योगीता पाटील, अशोक पाटील, चद्रकांत पोपेटा, योगेश पाटील, आलुराम केणी, चहुशेठ पोपेटा, मन्नालाल शर्मा आदी उपस्थित होते.

या वेळी दत्ता भगत, भगवान भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जयप्रकाश शर्मा, संगीता देवी, मन्नालाल शर्मा, नितेश शर्मा, इंद्रेश यादव, ज्योतीसलाल यादव, संजय मिश्रा, सत्यदेव राम, संगीता देवी, आशा शर्मा आदींनी भाजपत प्रवेश केला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply