Breaking News

नरेश म्हात्रे उरण तालुका भाजप चिटणीसपदी

उरण ः वार्ताहर

येथील शेकाप कार्यकर्ते नरेश म्हात्रे यांनी आपल्या 85 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. उरण करंजा रोडवरील गणेश नगर नं. 2 येथील लोकांना विश्वासात घेऊन त्यांना भाजप पक्षात प्रवेश देण्यात आला. आता नरेश म्हात्रे यांची उरण तालुका भाजप चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी नियुक्तीचे पत्र नरेश यांना देऊन अभिनंदन केले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर तांडेल, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, पंडित घरत, मनन पटेल, मनोहर सहतीय आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply