महाड : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून युतीची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जावे. विजय आपलाच आहे, असे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी येथे केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमधील भाजप निवडणूक कार्यालयात तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा सरचिटणीस महामुणकर उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत कोणाच्या दावणीला जाऊ नका, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, या वेळी तालुक्यातील असंख्य तरुणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी आणि विकासाने प्रेरीत होऊन भाजपत प्रवेश केला.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महाड तालुक्यात झालेली विकासकामे आणि कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांनी या बैठकीत केले.
महाड तालुक्यात 210 मतदान केंद्र असून प्रत्येक विभागातील 8 शक्तिप्रमुखांनी आपापल्या विभागातील मतदान केंद्रावर लक्ष ठेवून मतदान केंद्राची बांधणी करावी. सभासद नोंदणी अभियानचे शेवटचे पर्व सुरू आहे. त्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून हे अभियान अधिक गतिशील करा, असे जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले यांनी सांगितले.
यांनी केला भाजपत प्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीने आकर्षित होऊन युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र घारे यांच्या प्रयत्नाने महाड तालुक्यातील अनेक तरुणांनी भाजपत प्रवेश केला. मांडले येथील अर्जुन साळूंखे, किरण तांदलेकर, दिपक कचरे, विकास तांदलेकर, अर्जुन कासुर्डे, संदेश कासुर्डे, अर्जुन पवार, विजय तांदलेकर, करण साळूंखे, संजय तांदलेकर, अभिषेक साळवी, दिपक तांदलेकर, सनिल तांदलेकर, ओमकार तांदलेकर, ओमकार दिवेकर, किंजळोली सोनारकोंड येथील आकाश कदम, दिपेश शेलार, अंकुश अंबावले, निलेश पवार, वैश्यव पवार, साक्षात पवार, सनी कदम, केदार घरटकर, महेंद्र घरटकर, जितेंद्र घरटकर, सचिन रिंगे, सतीश कदम, तर महाड कोटआळी येथील अभिषेक महाडीक, अरबाज शेख, यज्ञेश भागवत, सौरभ पार्टे या तरुणांनी त्यांच्या सहकार्यांसह या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणर, राजेय भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.
भविष्यात सर्व निवडणुका भाजप लढविणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात भाजप पोहचवून, विकास केवळ भाजपच करु शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करावा.
-बिपीन महामुणकर, सरचिटणीस,
रायगड जिल्हा भाजप