Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश

खारघर : रामप्रहर वृत्त

जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)मध्ये झाली. या स्पर्धेत यजमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे स्वप्नील मोरे यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पदकप्राप्त विद्यार्थी

ओजस पोवार (इयत्ता सहावी) सुवर्ण व रौप्य, अंजली गुनाई (इयत्ता दहावी) सुवर्ण व रौप्य, ओमकार काळभोर (इयत्ता बारावी) सुवर्ण व कांस्य, क्रिश पटेल (इयत्ता दहावी) सुवर्ण व कांस्य, निहाल सिंग (इयत्ता सहावी) सुवर्ण व कांस्य, राज जाधव, आदिती रॉय (दोघेही इयत्ता दहावी) सुवर्ण, रोशनी शेलार व जयश्री गंतला (दोघेही इयत्ता बारावी) सुवर्ण, शिवीका शर्मा (इयत्ता आठवी) रौप्य व कांस्य, आशिष  गरुड, ओम जंगम, अथर्व धारप (तिघेही इयत्ता बारावी), रोचेल सिल्वा कुमार (इयत्ता नववी), श्रुती पवार (इयत्ता बारावी), पूजाश्री गंतला (इयत्ता दहावी), श्रेया चौधरी (इयत्ता सातवी).

इशिता भटनागर (इयत्ता दहावी) दोन कांस्य, तनिश गोठी (इयत्ता सातवी) दोन कांस्य, यश निर्गुण (इयत्ता बारावी) कांस्य, श्रुती म्हात्रे, प्रियांका पाटील, अबुझर मुल्ला (इयत्ता दहावी), निलेश गोस्वामी, बळीराम देठालीया (इयत्ता नववी), आर्य रासकर (इयत्ता आठवी), जील पटेल (इयत्ता सहावी) कांस्य.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply