Breaking News

पेणमध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन साजरा

पेण : प्रतिनिधी

अंकुर ट्रस्ट आणि लोकमंच संघटनेच्या वतीने चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन पेण येथे साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील रायगड बाजार  येथून हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती, तसेच महात्मा गांधी मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते.हुतात्मा नाग्या महादू कातकरी अमर रहे, अशा घोषणा देत रायगड बाजार येथून काढण्यात आलेल्या रॅलीत पेण तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील  महात्मा गांधी वाचनालय येथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले. या सभेत अंकुर ट्रस्टच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राजाभाऊ पाटील, प्रवीण चव्हाण, गणेश वाघमारे आदींसह अंकुर ट्रस्ट आणि लोकमंच संघटनेचे पदाधिकारी तसेच आदिवासी उपस्थित होते. या वेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य व कला आविष्काराचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Check Also

संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Leave a Reply