Breaking News

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई : प्रतिनिधी

इंडोनेशियातील बटाम येथे 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान रंगणार्‍या 53व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 65 जणांचा भारतीय संघ गुरुवारी (दि. 26) इंडोनेशियाला रवाना झाला असून, अनेक शरीरसौष्ठवपटूंकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

सहा वेळा जागतिक विजेता बॉबी सिंग तसेच सबरे सिंग, जयप्रकाश, वैभव महाजन या भारतीय रेल्वेच्या खेळाडूंसह रामा मूर्ती (सेनादल), चैत्रेशन नतेशन (केरळ) आणि टी. कँडी रियाज (मणिपूर) या शरीरसौष्ठवपटूंकडून भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि रोहन धुरी यांच्याकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवमध्ये अमला ब्रह्मचारी (महाराष्ट्र), माधवी बिलोचन (उत्तराखंड), तर फिजिक स्पोर्ट्स प्रकारात महाराष्ट्राच्या निसरीन पारीख, मंजिरी भावसार आणि आदिती बंब या सहभागी होत आहेत.

पहिल्यांदाच दिव्यांगांची स्पर्धा

आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच दिव्यांगांसाठीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्यात भारताचा दिव्यांग संघही उतरणार आहे. त्यामुळे दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंना एक चांगले व्यासपीठ याद्वारे मिळणार आहे. शामसिंग शेरा (पंजाब), अश्विन कुमार (छत्तीसगड), लोकेश कुमार (दिल्ली) आणि के. सुरेश (तामिळनाडू) हे दिव्यांग खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply