Breaking News

बुद्धिबळपटू मोक्षदा शेटची विभाग स्तरावर निवड

कर्जत : बातमीदार

कर्जत शहरातील शारदा मंदिर शाळेच्या मराठी माध्यमात शिक्षण घेणारी मोक्षदा दिनेश शेट या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे तिची कोकण विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या यशाबद्दल शारदा मंदिरच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष पुराणिक, तसेच मणेर यांनी मोक्षदा शेट हिचे अभिनंदन केलेे. मोक्षदा शाळेच्या क्रीडा प्रशिक्षक धनश्री कानडे यांच्याकडे बुद्धिबळाचे धडे गिरवित असून, तिला या खेळात पाठबळ देण्यासाठी शाळेचा क्रीडा विकास प्रकल्प यांनी मदत केली आहे. मोक्षदा आणि प्रशिक्षक कानडे यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांनी विशेष कौतुक केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply