Breaking News

पनवेलमध्ये घुमतोय भाजपचा नारा!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयी हॅट्ट्रिकचा कार्यकर्त्यांचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त

चला आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने बैठकांचा धडाका लावला आहे. यामुळे शहरी पट्टा असो वा ग्रामीण भाग, सिडको वसाहती असो वा वाडी-वस्ती सर्वत्र भाजपचा झंझावात पाहावयास मिळत आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना  लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देऊन विजयी हॅट्ट्रिक करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज होत आहेत.

भाजपने पनवेल विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या त्रिवेणी संगमातून पहिल्या टप्प्यात होणार्‍या बैठकांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे बुधवारी (दि. 25) पडघे, तळोजा-मजकूर आणि खारघर येथे बैठका झाल्या.

या वेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपच्या विजयासाठी एकदिलाने कामाला लागण्याचे आवाहन केले. आपला विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्ता ही पक्षाची ताकद असून, तुम्ही-आम्ही सारी मंडळी कार्यकर्ता असल्याच्या भावनेतून काम करून परिसराच्या शाश्वत विकासासाठी आणि जनतेच्या भल्याकरिता कायम कटिबद्ध राहू या, अशी साद दिली.

भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांचीही समयोचित भाषणे झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असून, त्यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी जोमाने काम करू या, असा सूर त्यांच्या भाषणातून व्यक्त झाला.

या विविध ठिकाणी झालेल्या बैठकांना भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव पाटील, लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक संतोष भोईर, अभिमन्यू पाटील, नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, प्रभाकर जोशी, माजी सरपंच कृष्णा पाटील, युवा नेते मयुरेश नेटकर, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, नेते मुनाफ पटेल, ओवे शहर अध्यक्ष सचिन वास्कर, तळोजा अध्यक्ष निर्दोष केणी, महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, मन्सूर पटेल, संदीप पांडे, गणेश जोशी, साजीद पटेल, शफी पटेल, विनोद घरत, रवींद्र खानावकर, हरिशेठ फडके, लहू डोंगरे, विनोद पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य राम जोशी, दीपक शिंदे, गुरुनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पडघे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, तर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply