पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 2) सायंकाळी 4 वाजता रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार निरंजन डावखरे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, प्रभाग समितीचे सभापती सर्वश्री अभिमन्यू पाटील, एकनाथ गायकवाड, दिलीप पाटील, चंद्रकांत ऊर्फ राजू सोनी, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर व शहर अभियंता संजय कटेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.