Breaking News

स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या विजया कदम भाजपत

पनवेल ः वार्ताहर

कळंबोलीसह नवी मुंबई, पनवेल, खारघर आदी विभागांत सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणार्‍या त्याचप्रमाणे स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून माता-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी वेळी-अवेळी धाव घेणार्‍या त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबईच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत राहून पोलिसांच्या मदतीला नेहमी जाणार्‍या विजया कदम यांनी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भाजपमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांंत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, तसेच त्यांनी पनवेल परिसरात सुरू केलेली विकासकामे, महिला वर्गासाठी राबविलेल्या विविध शासकीय योजना, वेळोवेळी करण्यात येणारे मार्गदर्शन, महिला सबलीकरण व स्त्री शक्तीला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍या पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply