Breaking News

कामोठ्यात भाजपची संवाद बैठक

कामोठे ः रामप्रहर वृत्त

कामोठे प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश तुपे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ अध्यक्ष यांची संवाद बैठक नुकतीच झाली. पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देण्यासाठी प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश तुपे यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती केंद्रप्रमुख व बुथ अध्यक्षांची संवाद बैठक नगरसेविका संतोषी तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झाली. या बैठकीला प्रभाग समिती प्रभाग ‘क’चे सभापती व शक्ती केंद्रप्रमुख गोपीनाथ भगत, नगरसेविका संतोषी तुपे, अरुणा भागत, नगरसेवक विजय चिपळेकर, कामोठे शहर चिटणीस भास्कर दांडेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, जयश्री धापटे, बुथ अध्यक्षा ललिता इनकर, सीमा साबळे, अस्मिता बोबडे, सोनवणे काका, प्रविण वाघमारे, दत्ता वाकारे, राजकुमार जाधव, संतोष नागमोडे, गणेश मांगुळकर, श्रीकांत नलावडे, राजू केदारे, भावेष साबळे, जयश्री  पाटील, महिला चिटणीस श्रीमती जगदाळे आदी उपस्थित होते. भास्कर दांडेकर, नगरसेवक विजय चितळेकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply