Breaking News

खोपोली पोलीस ‘इन अॅक्शन’

लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात आक्रमक पवित्रा; विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई

खोपोली ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. यासाठी नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक घरात बसत नसल्याने खोपोली पोलीस आक्रमक होत अ‍ॅक्शनमध्ये आले आहेत. कोणत्याही स्थितीत सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनचे पालन करावेच लागेल. जे कोणी याचे उल्लंघन करेल अशांवर व विनाकारण दुचाकी, चारचाकीवरून हिंडणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी दिला आहे. दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा पासधारकांशिवाय कोणत्याही व्यक्तीस दुचाकी व चार चाकीवरून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दैनंदिन भाजीपाला किंवा दूध, औषध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. नागरिकांनी घरीच राहून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे. रहिवासी परिसर व शहरातील अन्य सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांचे फिरते पथक कार्यरत असून कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय वारंवार घराबाहेर पडणार्‍या लोकांवर प्रसंगी पोलिसी दंडुकाही चालविला जात आहे.

लॉकडाऊन काळात अनधिकृतपणे दारू, गुटखाविक्री व पत्ते खेळण्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत आहेत. अशा बेकायदा कृत्य करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर असून यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. बेकायदेशीर कृत्य किंवा व्यवसाय करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

-डॉ. रणजित पाटील, पोलीस उपअधीक्षक

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply