पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ज्येष्ठ, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. त्यासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजता पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते जमणार असून, त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्यांकडे दाखल करण्यात येणार आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …