भाजप महिला अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांचीही उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शारदीय नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यनिमित्त माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा पनवेलच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी देवीचे बुधवारी मनोभावे दर्शन घेतले.
नवरात्रोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथील जय बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित दांडिया उत्सवाला भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायत सदस्या विजय घरत, युवा नेते साईचरण म्हात्रे, जय बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी न्हावे येथील गावदेवी मंदिर, गव्हाण येथील शांतादेवी मंदिर आणि पनवेल येथील दुर्गादेवी मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, भाजप महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस श्वेता खैरे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सुलोचना कल्याणकर, वर्षा नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.