रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामधील वाणिज्य प्रदर्शनाचे दिनांक 28 सप्टेंबर 2019 रोजी आयोजन करण्यात आले होते. या परिसरातील महाविद्यालयापैकी या महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील शाखाप्रमुखांनी ही वाणिज्य प्रदर्शनाची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.
अशाप्रकारचे वाणिज्य प्रदर्शन भरविणारे हे महाविद्यालय या भागातील पहिले महाविद्यालय आहे, असे गौरवोद्गार या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी प्रमुख पाहुणे प्रा. बी. एस. यादव यांनी काढले.
प्रदर्शन हे प्रामुख्याने तीन विभागांमध्ये विभागले होते. यामध्ये प्रथम विभागामध्ये निरनिराळ्या प्रकारची प्रारूपे (मॉडेलस) विद्यार्थ्यांनी तयार करून मांडली होती, तर दुसर्या विभागामध्ये निरनिराळ्या वाणिज्य शाखेतील विषयांवरील पत्रके (पोस्टर्स) प्रदर्शित केली होती. तिसरा प्रकार हा ‘चलने’ या थीमवर आधरित होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या देशांची चलने आणि त्यांचे भारतीय रुपयांमध्ये मूल्यांकन भारतीय स्मरणार्थ आणि चलनात नसलेले शिक्के, फॅन्सीनोटा त्याचप्रमाणे शिवकालीन, मुघलकालीन, पेशवेकालीन नाणी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदरच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे आणि पाहुणे डॉ. बी. एस. जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन आणि आयोजन हे वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा. अंजली पौलस्त्ये आणि या प्रदर्शनाचे आयोजन सचिव प्रा. नम्रता गजरा यांनी उपप्राचार्य शरदकुमार शाह यांच्या मार्गदर्शनाखाली केले.