Breaking News

पनवेल महापालिकेची मालमत्ता हस्तांतरण फी झाली कमी

पनवेलः प्रतिनिधी

 पनवेल महापालिकेच्या मंगळवारी  (दि. 18) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मालमत्ता हस्तांतरण फी इतर महापालिकांच्या तुलनेने जास्त असल्याने ती कमी करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून 400 प्रकरणांतील 25 लाख थकबाकी वसुली होण्याचा मार्ग मोकळा झाला.

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी  महापालिकेत अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, प्रभाग समिती

अध्यक्ष तेजस कांडपिळे यांसह समितीचे सर्व सदस्य हजर होते. या समितीतील अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्यासह आठ जण निवृत्त होणार असल्याने त्या सदस्यांची ही शेवटची बैठक होती.

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेत मालमत्ता हस्तांतरण फी, मालमत्तेच्या बाजारमूल्य दाराच्या 0.20 टक्केप्रमाणे आकारण्यात येते. ती आकारताना क्षेत्रफळानुसार किंवा हस्तांतरण प्रकरणानुसार कोणतीही विगटवारी केलेली नाही. त्यामुळे सामान्य माणसाला इतर महापालिकांच्या तुलनेने जास्त फी भरावी लागते. त्यामुळे 400 प्रकरणे प्रलंबित असून महापालिकेचा  25 लाखांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार सुधारित मालमता कर प्रस्तावित करण्याचा ठराव मांडला तो सर्वानुमते मंजूर झाला.

यानंतर मागील स्थायी समितीच्या बैठकीत स्थगित ठेवण्यात आलेल्या यांत्रिकी पध्दतीने धुरीकरण आणि फवारणी सेवा पुरवण्याच्या कामाला मंजुरी देताना 59 कामगारांऐवजी पूर्वी 79 कामगार होते तेवढेच कामगार ठेवण्यात यावेत. जुन्या कामगारांना कमी करू नये, असे ठरवण्यात आले. याशिवाय मासळी मार्केटची दैनंदिन सफाई यांत्रिक पध्दतीने करण्यास मंजुरी देण्यात आली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रात्री 9 सकाळी 6 या वेळेत तेथे कोणालाही बॉक्स ठेवण्यास परवानगी देऊ नये, अशी सूचना केली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply