Breaking News

रविवार ठरला ‘अपघात’वार; राज्यात तीन ठिकाणी नऊ जणांचा मृत्यू, 19 जखमी

नाशिक : प्रतिनिधी

मनमाड, बीड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अशा तीन वेगवगेळ्या ठिकाणी रविवारी (दि. 24) झालेल्या अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू; तर 19 जण जखमी झाले आहेत.

मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंतजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन आयशर टेम्पोंची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार झाले; तर 14 जण जखमी झाले. अपघातात मृत्युमुखी पावलेले सर्व जण टाकळी (नाशिक) येथील असून, केदराई येथे सर्व जण कार्यक्रमास चालले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीडमध्ये सोलापूर-धुळे मार्गावर कार आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अन्य एका अपघातात चार जण मृत्युमुखी पडले असून, तीन जण जखमी आहेत. हा अपघात सकाळी 9च्या सुमारास घडला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही रविवारी अपघात होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला; तर दोघे जखमी झाले आहेत. महादेव सुदाम पाटोळे (वय 33, रा. मुंब्रा-ठाणे) हे मित्र कृष्णा मडकेसोबत कारने प्रवास करीत होते. रात्री 1.25च्या सुमारास खालापूर हद्दीत सावरोली गावानजीक कार थांबवून पाटोळे लघुशंकेकरिता जात असताना अज्ञात वाहनाची ठोकर लागून त्यांचा मृत्यू झाला. माडप गावाच्या हद्दीत सकाळी 11च्या सुमारास झालेल्या आणखी एका अपघातात सुमोची धडक बसून कारमधील दोघे जखमी झाले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply