Breaking News

लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुरूड : प्रतिनिधी

नांदगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुरूड पोलिसांनी योगेश यशवंत तळेकर याला अटक करून मुरूड न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अंगणामध्ये काही लहान मुली खेळत असताना योगेश  तळेकर याने एका मुलीस जबरदस्तीने एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरातील लोकांनी तातडीने धाव घेऊन सदर लहान मुलीची सुखरूप सुटका केली. संतप्त नागरिकांनी याबाबत तक्रार दाखल करताच मुरूड पोलिसांनी योगेश तळेकर याला अटक करून त्याच्यावर भा.दं.वि. कलम 366 (अ)प्रमाणे गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर आरोपीवर अधिक कठोर कलम लावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांनी दिली.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply