पेण : प्रतिनिधी
ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा निवासस्थानी सहकुटुंब जाऊन पेण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि. 4) पेण तालुक्यातील वाशी येथून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आप्पासाहेबांची भेट ही मनाला शांती व समाधान देणारी ठरली असल्याचे रविशेठ पाटील यांनी सांगितले. या वेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, वैकुंठ पाटील, कौसल्या पाटील, शर्मिला पाटील, सुषमा पाटील, प्रतिभा पाटील आदींसह भाजपचे पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, बाबूराव कडू, संजय कडू उपस्थित होते.