पनवेल ः वार्ताहर
आदिशक्तीचा जागर मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरु आहे. त्यानिमित्त पनवेल मधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या उत्सवात शनिवारी आई व मुलगा किंवा मुलगी कपल डान्स या थीमला सर्वानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर यांनी भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोउत्सव साजरा करण्यात येतो. यंदा झंकार नवरात्रोत्सवाचे हे 13 वे वर्ष असून, दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात झंकार नवरात्रोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त शनिवारी आई व मुलगा किंवा मुलगी कपल डान्स अशी थीम ठेवण्यात आली होती. यावेळी उत्तम नृत्य करणार्यांना सभागृह नेते परेश ठाकुर, नगरसेवक राजु सोनी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल,सचिन जैन,सचिन सचदेव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले.