पनवेल ः वार्ताहर
नवीन पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्यावतीने नवरात्रो उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत असतो. त्याअंर्तगत दरवर्षी प्रमाणे यांच्यावर्षीही श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्यावतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे परिसातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपनेत्या श्वेता शेट्टी, शोभा सातपुते, अनिता रनदिवे, सितताई धिरे, आशा शेट्टी, उज्वला खटरे, उषा सातपुते, वंदना, शोभा, वर्षा मराठे, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.