पनवेल ः वार्ताहर
कळंबोली उड्डाण पुलाखाली परराज्यातून आलेल्या अनेक नागरिकांनी बेकायदेशीररीत्या वास्तव्य करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारामार्या, तसेच अपघात होत होते. याची दखल कळंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि सतीश गायकवाड यांनी घेऊन तातडीने वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणार्या नागरिकांवर
कारवाई केली.
कळंबोली उड्डाण पुलाखाली गेल्या काही महिन्यांपासून परराज्यातून आलेले रहिवासी तेथे बेकायदेशीररीत्या वास्तव्यास होते. त्यातील अनेक महिला व अल्पवयीन मुले भीक मागण्याचे काम रस्त्यावर करत होते. अनेक वेळा ही लहान मुले चालू गाडीजवळ धावत जात असत. त्यामुळे अपघातही घडले आहेत. रात्रीच्या वेळी तर ही लहान मुले दिसून येत नसल्याने वाहनचालकाला वाहन चालविणे भीतीयुक्त ठरत होते. त्याचप्रमाणे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू येथे विकत असत. त्यामुळे त्या खरेदी करण्यासाठी गाड्या रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत होती, तसेच या वस्तीमुळे चोर्यांचे प्रमाण वाढले होते. याबाबतच्या अनेक तक्रारी कळंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि सतीश गायकवाड यांच्याकडे येताच त्यांनी याकडे गांभीर्याने पाहून तातडीने बेकायदेशीर वास्तव्य करणार्या नागरिकांविरुद्ध वाहतूक शाखेच्या मदतीने कडक कारवाई केली व सदरचा परिसर मोकळा केला आहे.