मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धडाडणार आहे. 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान पंतप्रधान मोदी राज्यभरात प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामासाठी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ, तर भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 18 सभा होणार आहेत. पंतप्रधानांच्या सभा 13 ऑक्टोबरला जळगाव आणि विदर्भातील साकोली येथे, 16 तारखेला अकोला, परतूर व पनवेल येथे, 17 रोजी परळी, सातारा व पुण्यात आणि 18 ऑक्टोबरला मुंबईत होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जोडीलाच अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्य पिंजून काढणार असून, ते आपल्या सभांतून पक्ष, सरकारची भूमिका मांडतानाच विरोधकांवर प्रहार करतील.
Check Also
आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज
उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …