पनवेल : प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे कुचकामी नेतृत्व आणि दिशाहीन धोरणाला कंटाळून अनेक जण शेकापला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाच्या विकास प्रवाहात सहभागी होत आहेत. अशाच प्रकारे वाकडी, खैरवाडी, चिंध्रण, मोरबे येथील शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपत प्रवेश केला. वाकडी येथे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात झाला.
या कार्यक्रमास भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नरेश पाटील, नामदेव जमदाडे, नाना पाटील, रंजना पाटील, सरपंच कमला देशेकर, महादेव गडगे, कमलाकर केणी, रमेश पाटील, प्रभूदास खुटले, विलास चोरघे, संदीप पाटील, मंगेश पाटील, अरुण पाटील, धनंजय पाटील, शशिकांत दिसले, पांडुरंग केणी, बाळाराम पाटील,
एकनाथ मुंबईकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी खैरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जनार्दन कोळंबेकर, गणेश कोळंबेकर, अशोक म्हापळकर, संभाजी पिवळणकर, रमेश म्हापळकर, मोर्बे येथील राम शीद, नामदेव शीद, कमलाकर शीद, वामन शीद, सुरेश शीद, मनीषा शीद, कमलाकर शीद, वंदना शीद,
दुर्वेश शीद आदी तसेच मोरबे येथील अमोल शेलार, चिंध्रण येथील धनाजी कडू, दिनेश पाडेकर, बाळाराम पाडेकर, विलास पाडेकर, किसन पवार, अनिल पवार, सुनील पवार, आप्पा जमदाडे, रामदास जमदाडे, निखिल जमदाडे, अंकुश म्हात्रे, आकाश म्हात्रे, विकी म्हात्रे, अक्षय म्हात्रे, भरत पाटील, वाकडी येथील अनसूया वाघ, कमला कातकरी, सारिका वाघ, पपी वाघ, कविता वाघ, चिमी वाघ, मुक्ता वाघ, गुलाबी वाघ, लता वाघ, मनीषा वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले.
वाकडी विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सातत्याने पक्षप्रवेश सुरू आहे. त्यामुळे वाकडी हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनला आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर