Tuesday , March 28 2023
Breaking News

पिपाणीवाल्या आजी ठरल्या मॅन ऑफ दी वूमन!

लंडन : वृत्तसंस्था

बांगलादेशवर विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला, पण या सामन्यात सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले ते एका आज्जीबाईंनी. त्यांनी सामन्यात फुल टू धमाल केल्याचे पाहायला मिळाले. या आज्जीबाईंचे सामन्यातील व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणार्‍या या आज्जीबाईंचे नाव चारुलता पटेल असून, त्या 87 वर्षांच्या आहेत. त्या सामना पाहायला व्हिलचेअरवर आल्या होत्या. त्यांनी सामन्यात भारतीय संघाला चिअर अप करीत जी धमाल केली, तेवढा आनंद कुणालाही लुटता आला नाही. भारत विश्वचषक जिंकेल अशी खात्री असल्याचेही या आजींनी म्हटले आहे.

दरम्यान, भारताच्या खेळाडूंनाही या आज्जीबाईंना भेटायचा मोह आवरता आला नाही. कर्णधार विराट कोहली आणि या लढतीतील सामनावीर रोहित शर्मा यांनी या आज्जीबाईंची भेट घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले.

आनंद महिंद्रांकडून खास ऑफर

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा या आजींना मॅच विनर म्हटत त्यांना एक खास ऑफरही दिली आहे. चारूलता पटेल भारताचा सामना बघायला जाणार असतील, तर त्यांच्या तिकीटांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी महिंद्रा यांनी दाखवली आहे. आनंद महिंद्रा हेही क्रिकेटचे मोठे चाहते आहेत.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply