Breaking News

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी पनवेलमध्ये

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 25) सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास केंद्रीय पर्यावरण व वनेमंत्री भूपेंद्र यादव तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस तथा रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सेवा समर्पण अभियानचे प्रदेश प्रमुख राज पुरोहित, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनेतील लाभार्थींचा सन्मान, दिव्यांगांना मदत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना मदत तसेच कुष्ठरुग्णांना धान्यवाटप केले जाणार आहे.
एकात्म मानववाद भारतात रूजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जनमानसात ओळख आहे. संपूर्ण जग हे भांडवलशाही आणि साम्यवादावर वादविवाद करीत होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी तेव्हा याचा सुवर्णमध्य साधत एकात्म मानववाद मांडला. धर्म, अर्थ, काम मोक्षाकडे नेण्यासाठी असतात हा विचारही एकात्मवादात मांडला आहे. त्यांचा आदर्श घेऊन भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवा व समर्पण अभियान  अंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव, उपकरणे वाटप, आरोग्य तपासणी शिबिर, गरीबवस्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम व रुग्णालयांना भेट देऊन फळेवाटप, प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम, रक्तदान शिबीर, धान्य वाटप, कापडी पिशव्यांचे वाटप, नदीसफाई अभियान अशा प्रकारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाजप व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्र, बूथ अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply