उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये याकरिता उरण नगर परिषद यांच्या वतीने शहरात शनिवार व रविवार या दोन दिवस बाजारपेठ बंद ठेऊन सर्व ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. उरण शहरातील राजपाल नाका, जरीमरी मंदिर, फुल मार्केट, पेन्शनर पार्क आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
उरण तालुक्यातील कोरोना संसर्ग प्रादुर्भाव फारच वाढला असून या पुढे संसर्ग वाढू नये उरण शहरातील नागरिक सुरक्षित राहावे यासाठी उरण नगरपरिषद वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उरण शहरात कोरोना संसर्ग वाढू नये त्यावर उपाययोजना म्हणून शनिवारी (दि. 16) व रविवारी (दि. 17) या दोन दिवशी उरण बाजारपेठ संपूर्णता बंद ठेवण्यात आली होती. या दोन दिवशी उरण नगरपरिषदेने मोठ्या प्रमणात जंतुनाशक फवारणी केली. उरणचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सुचनेनुसार व उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जंतुनाशक फवारणी सुरु आहे. याकामी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरपरिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे, उरण नगरपरिषद आरोग्य निरीक्षक महेश लवटे, आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी व सर्व नगरसेवक, उरण नगरपरिषद कर्मचारी, सफाई कामगार आदींचे सहकार्य मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, संसर्ग होऊ नये त्याकडे उरण नगरपरिषद विशेष लक्ष देत आहे. या करिता उरण नगरपरिषद उपाययोजना करीत आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून उरण शहर हद्दीत जंतुनाशक फवारणी करीत आहे.
सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यामध्ये उरण नगरपरिषद देखील मागे नाही, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून उरण नगरपरिषदेकडून शहरात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. उरणमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर बाजार पेठ बंद ठेवून ही फवारणी करण्यात आली. नागरिकांनी आपापल्या घरीच रहा व सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या.
-रवी भोईर, उरण नगर परिषद गटनेता तथा नगरसेवक