Breaking News

एकच वादा प्रशांतदादा! गावे दुमदुमली; प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल : रामप्रहर वृत्त

188 पनवेल विधानसभा

मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व

मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) धानसर येथून सुरू झालेल्या प्रचार दौर्‍याला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचार दौर्‍यात ‘एकच वादा प्रशांतदादा’ने गावे दुमदुमून गेली. विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सज्ज असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल मतदारसंघाचा केलेला विकास पाहता एक लाखाहून अधिक मताधिक्याने त्यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्ते व पनवेलकर सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 9) धानसर, किरवली, धरणा, धरणा कॅम्प, रोहिंजण, पिसार्वे, तुर्भे, करवले, तळोजा मजकूर, पेठाली, पाचनंद, पापडीचापाडा, खुटारी, ओवे असा प्रचार दौरा होता. ‘एकच वादा प्रशांतदादा’ घोषणेने पनवेल विधानसभा

मतदारसंघातील गावोगाव दणाणून जात असून विकासाचा झंझावात कायम ठेवून पनवेलला सर्वांगीण विकासाचे रूप देणारे विकासपुरुष व भाजपचे उमेदवार, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

पनवेलच्या जनतेला सोयीसुविधा देण्याचे आणि पनवेलसह राज्यातील विविध प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्याचे प्रामाणिक काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. त्यामुळे प्रचार दौर्‍यावेळी विकासपुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वागतासाठी गावांच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी पाहायला मिळत होती. कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयजयकार करून जोरदार स्वागत होत असताना

चौकाचौकात महिलांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे औक्षण केले जात होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठांना नम्रपणे नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रचार दौर्‍यात महापौर डॉ. कविता चौतमोल, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, सुभाष कदम, नगरसेवक संतोष भोईर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, प्रभाकर जोशी, युवा नेते नंदकुमार म्हात्रे, अ‍ॅड. इर्शाद शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रचारादरम्यान माता-भगिनी औक्षण करून स्वागत करीत आहेत. वयोवृद्ध आशीर्वाद देत आहेत. या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. -प्रशांत ठाकूर, आमदार

प्रचारादरम्यान माता-भगिनी औक्षण करुन स्वागत करीत आहेत. वयोवृध्द आशीर्वाद देत आहेत, या प्रेमाने मी भारावून गेलो आहे.

-आमदार प्रशांत ठाकूर

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply