कर्जत : प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्टीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने कर्जत तालुक्यातील जांभुळवाडी, नागिरेवाडी आणि पुलाचीवाडी या वनवासी वाड्यांवर बुधवारी (दि. 26) भारतमाता पूजनाचे कार्यक्रम करण्यात आले.
जनकल्याण समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष संजीव दातार, संघाचे तालुका कार्यवाह संतोष देशमुख, तालुका व्यवस्था प्रमुख माहेश निगोजकर, तालुका बौद्धिक प्रमुख बळीराम डोंगरे, समितीचे कार्यकर्ते भगवान भगत, ग्रामस्थ कुमार गंगावणे, अतुल काळोखे, आरोग्यरक्षक पंढरी पसाळ, रवी भोई उपस्थित होते. संजीव दातार व संतोष देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतमाता पूजन कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली.
कर्जत : बातमीदार
नेरळ येथील अॅड. गजानन डुकरे (वय 47) यांनी 73व्या प्रजासत्ताक दिनी सायकलवरून 73 किमी अंतर तीन तासात पार करीत शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली.
अॅड. डुकरे यांनी बुधवारी सकाळी सव्वा सात वाजता नेरळ येथील आपल्या घरापासून सायकल प्रवासाला सुरूवात केली. नेरळ ते कर्जत मार्गावर दोन आणि नेरळ ते वांगणी एक फेरी असा तीन तासात एकूण 73 किलोमीटर सायकल प्रवास त्यांनी केला. त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कर्जत : बातमीदार
कल्याण-कर्जत राज्यमार्गावर असलेल्या माथेरान नाक्यावरील हुतात्मा चौकात बुधवारी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सनी चंचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी इंडियन फ्लॅग रेसमध्ये सहभागी झालेल्या अनेक हौशी सायकलपटूंनी तिरंग्याला अभिवादन केले.
ध्वजारोहणाच्या सुरुवातीला इंडियन फ्लॅग सायकल रेसमधील 65 ते 70 वर्षीय सायकलपटूंच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. महिला सायकलपटू यामिनी येवले यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती देणारे भाषण केले. हुतात्मा समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष दर्वेश पालकर, गणेश पवार, अजय गायकवाड, सदस्य बंडू शिरसागर, सुमित शिरसागर, विजय शिर्केम तसेच टॅक्सीचालक आणि पर्यटक उपस्थित होते.