पेण : प्रतिनिधी
191 पेण विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा सायंकाळी 4 वाजता नगर परिषदेच्या मैदानावर होणार असल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी दिली.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून माजी मंत्री रविशेठ पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी संपूर्ण मतदारसंघात जाहीर पक्षप्रवेश घडवून आणले होते. त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेचीही जय्यत तयारी सुरू आहे.