Breaking News

म्हसळ्यात आज अनंत गीते यांची जाहीर सभा

म्हसळा : प्रतिनिधी

 श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी म्हसळ्यात शुकवारी (दि. 11) दुपारी 1 वाजता माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या तोफा धडाडणार आहेत. या वेळी माजी आमदार अवधूत तटकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत.  श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने विनोद घोसाळकर यांच्या प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे महायुतीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. गाव, वाड्यापाड्यांवर बैठका भेटींचे आयोजन करून मतदारांशी संवाद साधण्यावर महायुतीने भर दिला आहे. महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी दुपारी म्हसळ्यात जाहीर प्रचार सभा घेण्यात येणार असून, त्यात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची भाषणे होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख महादेव पाटील यांनी या वेळी दिली.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply