कडाव : प्रतिनिधी
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद गटात उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले. या जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार थोरवे यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी दिली. कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या पाथरज जिल्हा परिषद गटाच्या प्रचार दौर्याची सुरुवात कशेळे आणि पाथरज पंचायत समितीच्या प्रत्येक बूथमध्ये करण्यात आली. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, पाथरज जिल्हा परिषद गटाचे प्रभारी रमेश मुंढे, सेनेचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, आरपीआयचे राहुल डाळिंबकर, दिलीप ताम्हाणे, विलास श्रीखंडे, दिनेश रसाळ, निलेश पिंपरकर, रमेश आहीर, शिवराम बदे, शरद म्हसे, रमेश मते, दीपक भोईर, रामचंद्र मिणमिणे, बाजीराव दळवी, अरुण कांबेरे, भगवान घुडे, ज्ञानेश्वर भालिवडे, रामा शेडगे, भगवान डोंगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रचार दौर्यात मतदारांशी संवाद साधला व महेंद्र थोरवे यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले. अनेक वर्षे आघाडीची सत्ता असताना जनतेचा सर्वांगीण विकास साधण्यात कुचकामी ठरलेल्यांना या वेळी जागा दाखवून द्या आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून येथील समस्या सोडवण्यासाठी महायुतीला मतदान करा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. पाथरज जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीचे सर्व शिलेदार प्रचार यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने कर्जतमध्ये महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.