Breaking News

‘कारमधील सर्व प्रवाशांसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने वाहन उत्पादकांना कारमधील सर्व प्रवाशांसाठी ’थ्री-पॉइंट’ सीट बेल्ट देणे बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशालादेखील सीट बेल्ट आवश्यक असणार आहे. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
ते म्हणाले की, गाडीच्या मागच्या सीटवर मधल्या भागात बसलेल्या प्रवाशालाही ही व्यवस्था लागू असेल. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, थ्री-पॉइंट सीट बेल्ट लॅप बेल्टपेक्षा सुरक्षित मानले जातात. ते प्रवाशांना अपघाताच्या वेळी अधिक सुरक्षा प्रदान करतात. अलीकडेच, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक मसुदा मंजूर केला आहे. ज्यामध्ये कार उत्पादकांनी आठ प्रवासी बसू शकतील अशा वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग्ज देणे आवश्यक असल्याचे नमुद केले आहे.
याशिवाय वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अडव्हान्स इमरजेंसी ब्रेकिंग सिस्टिम, वाहन चालक झोप लागल्यास अलर्ट सिस्टिम, लेन ड्रायव्हिंग वॉर्निंग सिस्टिम आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे गडकरी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply