नवी मुंबई ः बातमीदार केवळ 20 दिवसांत नवी मुंबइतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या 1183 बेड्स क्षमतेच्या कोविड रुग्णालयामध्ये 483 ऑक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. या बेड्सना तातडीची गरज म्हणून सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात होता, मात्र यामध्ये अधिक सुधारणा करीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा समान दाबाने मिळावा या दृष्टीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाइपलाइन बसविण्यात आली आहे. त्यानुसार लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. त्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून नुकतीच आयुक्तांनी या सर्व कामाची पाहणी केली. बुधवारपासून हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होऊन याद्वारे रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …