Breaking News

‘ज्यांच्या नावातच जयजयकार ते नाव गाजतंय आमदार प्रशांत ठाकूर’; महायुतीची प्रचारात मुसंडी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या या लाडक्या आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीच्या प्रचारासाठी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता उत्साहात प्रचार करीत आहेत. त्यामुळे ’ज्यांच्या नावातच जयजयकार ते नाव गाजतंय आमदार प्रशांत ठाकूर’ अशी गर्जना जागोजागी ऐकायला मिळत आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 12) पनवेलच्या ग्रामीण भागातील चिंध्रण, शिरवली, चिंचवली, आंबा, कुत्तरपाडा, मोहोदर, महालुंगी, मोर्बे, खानाव, वाकडी, केवाळे, हरिग्राम असा प्रचार दौरा होता. आमदार प्रशांत ठाकूर जसे मार्गक्रमण करीत होते, तसतसे त्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ पुढे येत होते. त्यांच्यासोबत युवकांची फळी मोठ्या संख्येने होती. या वेळी महिलांकडून जागोजागी औक्षण केले जात होते, तर ज्येष्ठ नागरिक भरभरून आशीर्वाद देत होते. या प्रचार दौर्‍यात महापौर डॉ. कविता चौतमोल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा उपप्रमुख रामदास पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, सुभाष कदम, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भूपेंद्र पाटील, प्रकाश खैरे, सरपंच कमला देशेकर, भालचंद्र सिनारे, पांडुरंग पाटील, तुकाराम पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply