Breaking News

वर्ल्ड किक बॉक्सिंग : चेतन भगत, प्रद्युम्न म्हात्रे, प्रणय टोपले यांचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रशिया येथे झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड किक बॉक्सिंगमध्ये चेतन भगत याने सिल्व्हर मेडल पटकावले. रशिया येथील अनपा शहरात 24 ते 29 सप्टेंबर दरम्यान झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड कप किक बॉक्सिंगमध्ये चेेतन भगत यांने उत्कृष्ट कामगिरी केली.

चेतन भगत हा उसर्ली खुर्द, ता. पनवेल येथे राहत असून तो सेंट वेल्फेर्ड, शेडुंग, पनवेल येथे शिक्षण घेत आहे, तसेच युनायटेड शोतोकॉन कराटे या असोशिएशनमध्ये तो प्रशिक्षण घेत आहे. या अगोदरही चेतन भगत याने चमकदार कामगिरी केली असून आतापर्यंत त्याने 20 गोल्ड मेडल मिळविले आहेत. याआधी भ्ाुटान, नेपाळ, दिल्ली हरियाणा, पंजाब, कोलकाता या ठिकाणी त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत, तसेच या स्पर्धेसाठी संतोष म्हात्रे, मंदार पनवेलकर, प्रशांत गांगर्डे, निखिल मते या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्याच्या यशाबाबत सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेत प्रणय टोपले याने उत्कृष्ट कामगिरी केली. प्रणय टोपले हा शिवकर, ता. पनवेल येथे राहत असून तो सी.के.टी कॉलेज, खांदा कॉलनी, पनवेल येथे शिक्षण घेत आहे, तसेच युनायटेड शोतोकॉन कराटे या असोशिएशनमध्ये तो प्रशिक्षण घेत आहे. या स्पर्धेत प्रद्युम्न म्हात्रे याने सिल्व्हर मेडल पटकावले. प्रद्युम्न म्हात्रे हा चिपळे, ता. पनवेल येथे राहत असून तो सी.के.टी. कॉलेज, नवीन पनवेल येथे शिक्षण घेत आहे, तसेच युनायटेड शोतोकॉन कराटे या असोशिएशनमध्ये तो प्रशिक्षण घेत आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply