Breaking News

उरण येथे चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ

उरण ः वार्ताहर

उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुकास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना बुधवारी (दि. 21) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजक भाजप सांस्कृतिक सेल उरण मंडल होते.

द्रोणागिरी नोड येथील श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास भाजप उरण विधानसभा प्रमुख नंदू पटवर्धन, मावळ लोकसभा समन्वयक अविनाश कोळी, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घरत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, सरचिटणीस निर्मला घरत, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, नगरसेवक नंदू लांबे, राजेश ठाकूर, भाजप तालुका उपाध्यक्ष पंडितशेठ घरत, हितेश शाह, मनोहर सहतीया, मुकुंद गावंड, प्रमोद म्हात्रे, सुरज म्हात्रे, मनोहर जामकर, विकास पाटेकर, विशाल पाटेकर, बादल म्हात्रे, सनी पाटील, अवि जैन, निखील म्हात्रे, अशोक म्हात्रे आदी उपस्थित होते.

प्रमुख संयोजक मनोहर जामकर, सहाय्यक संयोजक अशोक धनाजी म्हात्रे, विकास पाटेकर, विशाल पाटेकर, हर्षदा निखील माळी, मकरंद पोतदार आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

असे आहेत गटनिहाय विजेते

एकूण तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. 126 स्पर्धकांनी नोंदणी केली होती व त्यापैकी 84 स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. पहिल्या गटात (5 ते 12 वर्षे) प्रथम क्रमांक नुपूर निलेश हेंद्रे, द्वितीय दिया चंद्रकांत कडू, तृतीय तेजस संतोष उरणकर, उत्तेजनार्थ अनुज गुरुनाथ पाटील, जय लहू जाधव, दुसरा गट (12 ते 18 वर्षे) प्रथम क्र. जिया रवींद्र म्हात्रे, द्वितीय रुतूजा राजेंद्र ठाकूर, तृतीय पार्थिव प्रकाश पाटील, उत्तेजनार्थ साजिरी निलेश कदम, प्रीती हारू बेरा, समृद्धी प्रमोद म्हात्रे, तिसरा गट (खुला) प्रथम दिपेश दत्ताराम पांचाळ, द्वितीय सत्यजित मोहन कडू, तृतीय  अमरनाथ दिनानाथ पाटील.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply