Breaking News

अपंग बांधवही महायुतीसोबत

आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे समिती सभापती प्रकाश बिनेदार व इतर मान्यवर हजर होते. या वेळी अपंग क्रांती संघटनेने महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिव्यांगांबद्दल आत्मियता व्यक्त केली. दिव्यांग बंधू-भगिनी हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या अनेक समस्या व अडचणी याबाबत मला जाणीव आहे. महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे धोरण महानगरपालिकेने तयार केले आहे. दिव्यांगांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून हे काम आमचे सरकार व महानगरपालिका निश्चितच करील, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य मी स्वतः करणार आहे, असे ते म्हणाले.

या वेळी महानगरपालिका समिती सभापती प्रकाश बिनेदार यांनीसुद्धा संघटनेला दिव्यांगांच्या विकासाबाबत चर्चा करून आमदारांच्या वतीने ठाम आश्वासन दिले. संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष विलास सखाराम फडके, खजिनदार खगेश्वर मोहंती, तालुकाध्यक्ष बाळू शिंदे, बाळाराम रोडपालकर, विभागीय अध्यक्ष अतुल रायबोले, विनोद देवकर, उज्ज्वला नलावडे, संदेश दलाल, अहमद युसूफ कच्छी, आनंदा देसाई, रवींद्र राठोड, लक्ष्मी तांबडे, अनिता म्हात्रे, अनिता मसुदे, रेश्मा कांबले व दिव्यांग सदस्य व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने हजर होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply