

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्था व दिशा महिला मंच आयोजित कामोठ्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्वान महिलांचे सत्कार नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण जीवनविद्या ज्ञानसाधना केंद्र येथे झाले. त्या प्रसंगी जीवन विद्यामिशनचे प्रमुख प्रल्हाद वामनराव पै हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्तिथ होते.
सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश तुपे,नगरसेविका संतोषी तुपे, अर्चना परेश ठाकूर, जीवन विद्या मिशनचे सचिव विवेक बावकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, नगरसेवक गोपीनाथ भगत, नगरसेवक अरुणकुमार भगत संदीप तुपे, दिशा महिला मंचच्या संस्थापक निलम आंधळे व हर्षाली गवंडे, उपस्थित होते.
प्रल्हाद वामराव पै यांनी नवदुर्गाचे कौतुक करत महिलांना मार्गदर्शन करून मुलांना समुपदेशन केले. अर्चनाताई ठाकूर यांनी या सोहळ्याचे कौतुक करत यापुढेही कामोठ्यात असेच सामाजिक कार्यक्रम यापुढेही चालू ठेवा म्हणत सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्थेला आणि दिशा महिला मंचला कौतुकाची थाप देत शुभेच्छा दिल्या.
या वेळी आशा भगत- वकील व सामाजिक क्षेत्र, विमल बिडवे- शासकीय क्षेत्र, स्मिता पनवेलकर-शैक्षणिक क्षेत्र, सुलक्षणा जगदाळे- वकील व सामाजिक, मनीषा चांडक- वैद्यकीय क्षेत्र, संगीता राऊत-सामाजिक क्षेत्र, वैशाली जवादे -वैद्यकीय क्षेत्र, श्रीजीता बॅनर्जी-मॉडेलिंग आणि ऍक्टिंग,स्वप्नाली म्हात्रे -शैक्षणिक क्षेत्र, मिनल वसमतकर-साहित्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी दिशा महिला मंचच्या प्रतिनिधी यांचा सदस्य वाढीसाठी ख़ुशी सावर्डेकर, विद्या मोहिते, स्मिता देसाई, ऐश्वर्या नलावडे, राजश्री कदम, अपर्णा कांबळे, उषा डुकरे, कांचनमाला वाफारे, संगीता चौधरी, जयश्री गोरवेया महिलांचाही सत्कार करण्यात आला.