पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत विद्यालयाचे चेअरमन रवींद्र चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी संगम माजी विद्यार्थी गुणगौरव, दहावी शुभचिंतन व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात झाला.
अमरदीप बालविकास फाऊंडेशन पनवेलच्या मार्फत मार्च 2018च्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. प्रसंगी प्रधान कुलकर्णी सहशिक्षक ठाणे यांना ‘अमरदीप गौरव पुरस्कार’, मधुकर पवार रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना ‘जनरक्षक सन्मान’ व वरिष्ठ लिपिक सुरेश राऊत यांना ‘अमरदीप प्रेरणा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दहावी शुभचिंतन कार्यक्रमात अंजली चव्हाण वरद हळदणकर यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय बुद्धिबळ पंच मंगला बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे चेअरमन रवींद्र चोरघे, मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम, उपशिक्षिका एस. बी. काळे यांनी विद्यार्थ्यांना मनोगताबरोबरच शुभेच्छा दिल्या.
वार्षिक स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे मराठी, हिंदी नृत्य आविष्कार सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना टाळ्यांची साथ देत रोख बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाला स्कूल कमिटी सदस्य दमयंती भगत, संगीताताई केळकर, राधाबाई चौधरी, रमेश गवंडी, पोलीस पाटील एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक जाधव व महाजन साहेब, माजी प्राचार्य फातिमा मुजावर, शंकर बिराजदार, एन. डी. खान, सलमा खान, ताकमोगे, मिलिंद खारपाटील, अस्लम नाईक, ललिता गोविंद, पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षिका एच. आर. पाटील, उपशिक्षक एच. एन. पाटील यांनी केले. आभार पी. जी. पाटील, डी. के. म्हात्रे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.