पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टी, उलवे नोड तसेच उलवे आय क्लिनिक यांच्या सहयोगाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले असून, या वेळी माजी खासदार लोकनेते ठाकूर यांनी भेट दिली.
वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, उलवे नोड तसेच उलवे आय क्लिनिक यांच्या सहयोगाने मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला.
या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत उलवे नोड 2 अध्यक्ष, विजय घरत, वहाळ ग्रामपंचायत सदस्य गीता ठाकूर, चेतन घरत, मंजुळा कोळी, अंकुशशेठ ठाकूर, समृद्धी अडसुले, संगिता शिंदे, गुलाबशेठ नाईक, पदाजी नाईक, आशा पाटील, वनिता बाबर, गोपी भोईर, राजेश सुंदरम, राधाबाई ठाकूर, सुनंदा म्हात्रे, नंदकुमार ठाकूर, किरण गौतम, केसरीनाथ म्हात्रे, मदन म्हात्रे, गायकवाड, युवा नेते वैभव ठाकूर, वाशी एमजीएम हॉस्पिटलचे नेत्र चिकित्सक डॉ. सुस्नाता चॅटर्जी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी महिला मोर्च्याच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी मनोगत व्यक्त केले.