श्रीगाव : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत म्हसोबा पेझारी संघाने विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन समर्थ सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र पाटील व सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेस माजी नगरसेवक प्रवीण ठाकूर, अॅड. उमेश ठाकूर, सुमित भोईर, शिवनेरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजा केणी, उद्योजक प्रकाश तुरे, श्रीगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विकास निकलकर, माजी सदस्य प्रकाश पाटील, कुर्डूसचे सरपंच अनंत पाटील आदींनी सदिच्छा भेट दिली. विजेत्या म्हसोबा पेझारी संघाला स्व. नथुराम तुरे फिरता स्मृतिचषक व 21 हजार रुपये, द्वितीय न्यू चॅलेंजर्स कोपर संघाला 15 हजार रु, तृतीय व चतुर्थ क्रमांकप्राप्त श्री विठ्ठल कोपरपाडा व चॅलेंजर्स कोपर यांना प्रत्येकी दहा हजार रुपए व विजयी संघांना स्व. अनुसूया लक्ष्मण पाटील स्मृतिचषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू कुणाल पाटील (चॅलेंजर्स कोपर), उत्कृष्ट पकड करणारा रूपेश जाधव (म्हसोबा पेझारी), मालिकावीर संदेश ठाकूर (न्यू चॅलेंजर्स कोपर), उत्कृष्ट खेळाडू मितेश पाटील (म्हसोबा पेझारी) यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धेदरम्यान मेढेखार गावातील गुणवंत विद्यार्थी व परिसरातील गुणीजनांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.