Breaking News

सर्वांनी मतदान करा

निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांचे आवाहन

पोलादपूर एसटी स्थानक आणि सडवली आदिवासीवाडीत पथनाट्य

पोलादपूर : प्रतिनिधी

रायगड जिल्हाधिकारी आणि प्रिझम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 15) दुपारी पोलादपूर एसटी स्थानक आणि  तालुक्यातील सडवली आदिवासीवाडीत पथनाट्यांद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली.

रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, नोडल अधिकारी स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनील पाटील, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, पोलादपूर तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी दीप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ’मतदान एक जबाबदारी’ जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई, निवडणूक शाखेचे आंबीलकर, तलाठी महाडिक, मंडल अधिकारी खेडकर, एसटी स्थानक वाहतूक नियंत्रक सुधीर खानविलकर उपस्थित होते.

या पथनाट्याचे नेतृत्व युवा पुरस्कारप्राप्त तपस्वी गोंधळी यांनी केले. सुचित जावरे, सपना पटवा, प्रेम पाटील, तुषार राऊळ, श्वेता खारकर, प्रसाद अमृते व प्रांजली पाटील आदी कलाकारांनी कोणत्याही आमिषाविना मतदान, व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सात सेकंद मतदान केलेले चिन्ह दिसणार, दिव्यांगांसाठी रॅम्पद्वारे मतदान केंद्रात पोहचण्याची सुविधा आदी विषयांचा ऊहापोह करून 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदार नोंदणी करून मतदान केलेच पाहिजे. कारण तो सुटीचा दिवस नसून राष्ट्रीय सोहळा आहे, असे सादरीकरण पथनाट्याद्वारे केले.

दुर्गम वाड्या वस्त्यांतील आदिवासी व अन्य नागरिकांनी सूज्ञ मतदारांप्रमाणे मतदान करावे तसेच सर्वांनी 100 टक्के मतदान करावे.

-समीर देसाई, निवासी नायब तहसीलदार, पोलादपूर

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply