Breaking News

भावनिक साद आणि पायी प्रचार

मंदा म्हात्रे यांच्या पदाधिकार्‍यांशी भेटीगाठी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी बैठका घेऊन प्रचार मिरवणुकांचे नियोजन केले आहे. पायी प्रचार करीत त्या मतदारांना भावनिक साद घालीत आहेत.

बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हात्रे सकाळी प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. 10 नंतर त्यांच्या प्रचाराला वेग येत आहे. विविध भागांतील गृहसंस्थांमधील प्रचाराबरोबरच विविध संघटना आणि संस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. म्हात्रे यांचा प्रचारातील उत्साह कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. म्हात्रे यांचा प्रचार दोन टप्प्यांत होत आहे. आधी पक्षातील पदाधिकार्‍यांशी चर्चा करून प्रचारातील मुद्द्यांना स्पर्श केला जात आहे. सोमवारी सकाळी म्हात्रे यांचा पहिला कार्यक्रम हाच होता. निवासस्थानी सकाळी भेटायला आलेल्या पदाधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर वाशी आणि नेरूळ येथील विविध गृहसंस्थांमध्ये प्रचारास सुरुवात केली. बेलापूर मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत काहीसे गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांची त्यांनी त्यांच्या बेलापूर येथील निवासस्थानी बैठक घेतली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply