Breaking News

रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी महेश ठाकूर

धाटाव : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शिफारशीनुसार व आमदार रविशेठ पाटील यांच्या सूचनेनुसार महेश ठाकूर (रा. पाले) यांची रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा विश्रामगृहात मंगळवारी (दि. 18) युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी महेश ठाकूर  यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. भाजपचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मापारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, युवा मोर्चाचे राजेश डाके, जयदीप तांबुटकर, नरेश कोकरे,  वैभव कुलकर्णी, अविनाश कान्हेकर, कृष्णा बामणे, यज्ञेश भांड,  सनल  कुमार,  आंनद लाड, शिवाजी पाटील, भाऊ शेलार, संजय लोटणकर सरचिटणीस, श्रेया कुंठे याच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.युवा मोर्चाच्या रोहा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल महेश ठाकूर यांचे माजी आमदार अवधूत तटकरे, युवा नेते वैकुंठ पाटील यांनी अभिनंदन केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply